Header Ads Widget

नरसीच्या मास्टर किरण कोरे ने पटकावले राज्यस्तरीय लावणी चे प्रथम पारितोषिक



विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे : 

नरसी येथील हरहुन्नरी नृत्य कलावंत किरण कोरे याने आष्टी (बीड) येथील "गंगाई - बाबाजी" महोत्सवातील राज्यस्तरीय लावणी स्पर्धा गाजवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले आहे.या बद्दल कोरेचे सर्वत्र आभिनंदन होत आहे
केवळ महाराष्ट्र किंवा देशांतर्गतच नव्हे तर विदेशातील कलामंच देखील आपल्या अप्रतिम लावणी नृत्याने दणाणून सोडणारा नरसीचा भुमिपूञ किरण कोरे याने अगदी बालपणा पासून नृत्याची आवड जोपासली असून ग्रामीण नाटयकला क्षेञात भरीव योगदान देणारे दिवंगत शिवलिंगराव कोरे गुरुजी यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सशक्तपणे पुढे नेण्याचे काम किरण करत आहे.मराठमोळी लावणी ही किरणच्या नृत्यातील हुकमी एक्का आहे.अफलातून पदलालित्य व ठसकेबाज सादरीकरण यामुळे प्रत्येक गाण्याला वन्स मोअर घेणारा किरण कोरे हा लावणी सम्राट म्हणून सर्वञ सुपरिचीत आहे.किरणने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलामंचावर अनेक पदके जिंकले आहेत.नुकतेच बीड जिल्ह्यातील आष्टी येथे भगवान महाविद्यालयात झालेल्या गंगाई बाबाजी महोत्सवातील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत किरणने नृत्यकलेचा करिश्मा दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.किरणच्या लावणीला दर्दी रसिकांनी प्रचंड दाद देत भरभरुन कौतुकही केले.रोख अकरा हजार रुपये, मानचिन्ह व सन्मानपञ देवून किरणला यावेळी गौरविण्यात आले.या यशाबद्दल किरण कोरेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

0 Comments