नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :-
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नेमके काय घडते ? आणि काय घडत नाही हा संशोधन करण्या सारखे विषय मोठया प्रमाणात आहेत
कालपरवाच एका महिलेने शंकर नगर व नरसीच्या चौकात घातलेला गोंधळ आणि आक्रोश या मागचे नेमके कारण काय ? सदरच विषय नार्मल की गंभीर असा ही प्रश्न चर्चेला जात असला तरी पोलिसा बदल सदरच्या महिलेनी केलेला आक्रोश या प्रकरणात नेमकी सत्य घटना काय जनते समोर येणे गरजेचे आहेतालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी आपले पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावत आहेत असे अनेकाचे म्हणे असले तरी नरसीच्या चौकात गोंधळ व आक्रोश घेणाऱ्या महिलेचे प्रकरण कोणते आणि पोलीस त्या महिलेची तक्रार घेण्यासाठी विलंब लावला का ? तक्रार करणाऱ्या लोकांचे पोलीस अधिकाऱ्यावर समाधान नाही झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाता येते परंतु सदरचा केलेला आक्रोश हा कशासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे
सदरच्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची चर्चा ?
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी सदर महिलेच्या नातेवाईकां कडून व महिले कडून काय जबाब रजिस्टरला नोंदवला हे अतिशय महत्वाचा प्रश्न असला तरी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांना समजावून सांगतात अशी चर्चा काही महिन्या पूर्वी होत होती " मग " आता कुठे पाणी मुरतोय " का "मुरतोय की पोलीसांना वेठीस धरण्याचे प्रकार चालू आहेत का ? तितकाच महत्वाचा प्रश्न आहे

0 Comments