Header Ads Widget

अपघात टाळण्यासाठी मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकाकडे लक्ष द्या ५० टक्के अपघात टळतील - जनतेची मागणी -


    
      माधव पवार
अपघात टाळण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे मद्यपान करून स्पीडने वाहने चालविणाऱ्या वहानाची चौकशी करू आळा बसविल्यास नक्कीच ५० टक्के अपघात टळतील असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे

धावपळीच्या जीवनातील अनेक प्रसंगाला मानव धर्माला सामोरे जावे लागत असून शासन जे नियमावली लागू करेल त्या नियमानुसार  जन सामान्य माणसाला वागावे लागणार असून अनेक विविध क्षेत्रात स्पर्धा लागल्या आहेत
व्यापार क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो की वहानाच्या स्पर्धा लागल्या असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार पूर्वी रस्त्यावर चालत असताना डाव्या बाजूने चालण्यासाठी योग्य आणि उजव्या बाजूने गेले तर अयोग्य म्हणून शासन ठरवित होते

आता तसे राहिले नाही शासनाच्या ध्येय धोरणानुसार आता रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चालू नये उजव्या बाजूने चालले तरच अपघात टळतील असे शासनाचे मोठे धोरण आहे
शासनाने रस्त्याचा नियम बदल्यामुळे जनतेतून अभिनंदन करण्यात येत असले तरी रस्त्यावर मोठया स्पीडने वाहने दारूच्या नशेत चालवित असताना दिसून येत आहेत त्यांचे काय ? असा प्रश्न जनतेतून केला जात असून मद्यपान करून वाहने चालवित असल्यामुळे अनेक अपघात रस्त्यावर होत आहेत

अनेकाना जीव गमवावा लागत असल्याचे अनेक उदाहरण व अपघात झाल्याचे वास्तब चित्र पाहवयास मिळाले असताना सुद्धा शासन या वाहन धारकाची चौकशी करून कारवाई केल्या जात नाही ही दुर्दैवी बाब आहे

Post a Comment

0 Comments