Header Ads Widget

प्रशासनाची तिजोरी भक्कम करण्यासाठी दंडात्मक अवैध उत्खलन करणाऱ्यावर कारवाई करणार - तहसीलदार गजानन शिंदे -

     माधव पवार
नायगाव तालुक्यात रेतीचे असो की मातीचे अथवा मुरुमाचे असो की दगडाचे अवैध उत्खलन महसूल प्रशासनाच्या नजरा चुकून कोणी करत असेल तर अवैध उत्खलन करत असलेल्या ठिकाणी जास्तीचे लक्ष घालून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे नायगावचे  कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 
--------------------------------------------------------------------
सदरच्या दंडात्मक कारवाईत मोठया प्रमाणात अवैध  उत्खलन करणाऱ्या वहानावर दंड आकारून महसूल प्रशासनाची तिजोरीत भक्कम करणार असल्याचे ही तहसीलदार शिंदे यांनी सांगितले राहेर विभागात असो बरबडा परिसरात गोदावरी पत्रातून अवैध रेतीचे उत्खन होत असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहें 
---------------------------------------------------------------------
तालुक्यातील व बाहेर तालुक्यातून विना रॉल्टीची रेतीची वाहतूक होत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करण्यासाठी नायगावचे तहसीलदार सरसवले असून ही सदरची मोहीम कंटिन्यू राबविण्यात येणार असल्याचे सांगितले

यात अवैध रेती उत्खलन असो मुरुमाचे उत्खलन असो त्याच बरोबर गोदावरी काठावरच्या वीट भट्यासाठी वीट भट्टी धारक जर मातीचे अवैध उत्खलन करत असल्यास त्यांच्या वरही दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ही तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments