राज्याच्या राजकारणात मोठे फेर बदल होत असतात परंतु दोन नामांकित पक्ष प्रमुख जेव्हा एकत्र येतात तेव्हा पक्षाची ताकद मोठया प्रमाणात वाढते हे दाखवून देण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख तथा राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर यांच्या युतीवर शिक्का मोर्तब होताच दोन्ही ही विद्यमान पक्षाचे कार्यकर्त्यात एकत्र येऊन बिलोली येथे जल्लोष करण्यात आला आहे राज्यातील किती ही हिमालया सारखे राजकीय संकट या दोन्ही पक्षावर आल्यास कोणत्या परिस्थितीत त्या संकटाचा सामना करून सत्ता उलथुन पाडण्याची शक्ती या पक्षात असल्यामुळे सदर दोन्ही पक्ष प्रमुख एकत्र आले असल्यामुळे नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि राष्ट्रीय नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख युतीवर शिक्का मोर्तब केल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन फटक्याची अतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला आहे
बिलोलीसह नायगाव तालुक्यात गेल्या बऱ्याच महिन्यांपासून राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसह माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होणारच असल्याची चर्चा मोठया प्रमाणात होत होती अखेर दोन्ही बंलाड्या नामांकित पक्षाच्या प्रमुखाचे स्वप्न साकार झाले असल्यामुळे राज्यात मोठी दोन्ही पक्षाची ताकद वाढली आहेयावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे, व्यंकट गुजरवाड तालुका संकटक, शिवकुमार बाबणे देगलूर बिलोली समन्वयक, युवासेना तालुकाप्रमुख माणिक पाटील हिवराळे, कुंडलवाडी शिवसेना शहर प्रमुख शंकर कोणेरवार, युवा सेना शहर प्रमुख कुंडलवाडी बंटी साठे आदी उपस्थित होते
दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे बालाजी लष्करे विभाग प्रमुख लोहगाव, सदाशिव बोडके विभाग प्रमुख आरळी ,सुधाकर पाटील नरवाडे, आनंदराव पाटील हिवराळे युवासेना उपतालुकाप्रमुख, प्रशांत वानोळे उपतालुकाप्रमुख युवासेना, प्रल्हाद पाटील कदम शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख धम्मदीप गावंडे व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

0 Comments