बरबडा :- किरण हणमंते
बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे जिल्हा परिषद शाळा आणि जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली
ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच छायाताई धर्माधिकारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सरपंच माधव कोलगाने, ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रल्हाद जेटेवाड यांच्या समवेत बचत गटांच्या महिला आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा बरबडा या ठिकाणी महिला शिक्षिकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालण्यात आला आहे
यावेळी केंद्रप्रमुख माधव रेडेवाड,केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे,प्रकाश कुंभरगावे, साहेब सुरेवाड, शिवाजी शेवाळे, दिलिप जेटेवाड, प्रभाकर शिंदे, आनंद आलुरे, माधव विभुते, दत्ता अंबुलगे, गोविंद मार्गेपवार, पत्रकार मारोती बारदेवाड व रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते या बळवंत शिंदे, सहित राजश्री भैराट, देशमुख मॅडम या शिक्षिका आणि बबिता विडेकर, आशाबाई सर्जे, मधुमती कुलकर्णी, शोभा विठ्ठलकर,आदी उपस्थिती होते सिंधुताई जाधव, सिमा सर्जे शांताबाई नेरलेवाड, नंदा बोईनवाड, मायाताई देशमुख इत्यादी अंगणवाडी कार्यकर्त्या आणि छायाताई गुंडाळे, अंजनाबाई जेटेवाड, सुनीता बोरगावकर, जयश्री सोनटक्के, रुक्मिणीबाई तेलंगे या मदतनीस उपस्थित होत्या. या वेळी सर्व शिक्षक महिलांनचा सत्कार शाळेच्या विद्यार्थीनी केला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यालयात सर्व शिक्षिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पुजा करून पुष्पहार अर्पण केला
यावेळी शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, पर्यवेक्षक सुर्यकांत फड यांच्या सहित शिक्षक व विध्यार्थी यांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. दोन्हीही शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली आणि वेशभूषा परिधान करून वावरत होती.

0 Comments