माधव पवार
महाराष्ट्र ही साधू संताची भूमी आहे शूरविरांची भूमी आहे या संताच्या भूमीत मोठं मोठाले महा पुरुष जन्माला आले आहेंत या महा पुरुषाचा साऱ्या जगातील प्रजा आदर करतात तर जन सामान्य माणूस महापुरुषाचा मोठया आदराने गौरव करतो तर याच राज्यातील राजकीय नेते मंडळी महापुरुषाच्या बदल बेताल वक्तव्य करत असल्याचा सपाटा उठविला आहे
-------------------------------------------------------------------
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणता महत्वपूर्ण निर्णय घेतला जात नाही दारू बंदीवर काही अंकुश नाही शेतकऱ्यांना अध्याप विमा कंपनी कडून विमा मिळाला नाही ग्रामीण भागातील रस्त्याची विल्हेवाट लागली त्यांचे काही नाही थोडे लक्ष द्या फक्त महापुरुषा बदल वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचा अवमान करीत असून हे कुठे तरी थांबले पाहिजे जनतेचे मत आहे
-------------------------------------------------------------------
या महाराष्ट्राच्या शूर भूमीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले शिव छत्रपती संभाजी राजे जन्मास आले असे अनेक महा पुरुष या महाराष्ट्राच्या मातीत जन्मास आले असल्यामुळे त्यांच्या कर्तव्याने राज्य आज जिवंत असताना सुद्धा या राज्यातील राजकीय नेते महापुरुषाचा वेळोवेळी अपमान कारक वक्तव्य करीत असल्यामुळे त्यांचा जनतेतून जाहिर निषेध करण्यात येत आहे
इतर राज्या पेक्षा महाराष्ट्रातील मंत्री संत्री यांनी कधी बहुजनाचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल वक्तव्य केले महात्मा जोतीबा फुले यांच्या बदल बेताल गरळ ओखली तर शिव छत्रपती संभाजी राजे यांच्या विषयी वक्तव्य केले असल्यामुळे या राज्यातील नेते मंडळी काय सर्वच सोडली काय ? प्रश्न जनतेला पडला बेताल वक्तव्य करायचे आणि माफी मागून मोकळे होण्याचा धंदा नेते लावले आहेत

0 Comments