बरबडा :- किरण हणमंते
बरबडा येथील पुनर्वसन भागात 1 जानेवारी ला अनेक अनुयायी भीमा कोरेगाव ला विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतात. त्याच अनुषंगाने बरबडा येथे बॅनर वर प्रतिकृती तयार करून त्याला अभिवादन करण्यात आले.यावेळी रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृती विजय स्तंभाला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा बसपा जिल्हाउपाध्यक्ष मनोहर ढुमणे, गौतम हनमंते, पत्रकार सोनु पेंटर वाघमारे, रत्नदीप कांबळे, पांडुरंग सुर्यतळ, गुलाब कांबळे, अभय सूर्यतळ, सचिन सूर्यतळ, काशी सूर्यतळ, धनराज हनुमंते, प्रदीप कांबळे, शुभम हनुमंते,आदी उपस्थिती होते
यावेळी अक्षय हनुमंते, संस्कार हनुमंते, क्रांतीकुमार सूर्यतळ, अजय सूर्यतळ, राजेश हनुमंते, राजरत्न हनुमंते, बुद्धभूषण कांबळे यांच्या सहित बालक बालिका आणि महिलांची उपस्थिती होती.या सर्वांच्या उपस्थितीत अभिवादन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
याच कार्यक्रमाला उपस्थितीत असणारे रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते यांचा वाढदिवस समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पत्रकार सोनु पेंटर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.



0 Comments