Header Ads Widget

नरसी ग्रामपंचायत च्या वतीने पत्रकार पेरकेवार यांचा सत्कार

      गोविंद नरसीकर

नरसी येथील पत्रकार सुभाष पेरकेवार यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल नरसी ग्राम पंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला आहे 

दैनिक प्रजावाणीचे पत्रकार सुभाष पेरकेवार हे गेली २२ वर्ष पत्रकार संघात काम करित असताना त्यांनी कधीच कुण्या पदाची अपेक्षा केली नाही मात्र ते आजवर पत्रकारांसाठी निःपक्षपतीपणे काम करीत राहिले. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारणीवर जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी नरसी येथील सुभाष पेरकेवार यांची निवड केल्याने नायगाव तालुक्यांतील सर्वाच पत्रकारांना त्याचा आनंद झाला आहे 
      
गावचा पत्रकार जिल्हा कार्यकारणीवर गेल्याने नरसी ग्रामपंचायतीलाही तेवढाच आनंद झाला दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुभाष पेरकेवार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे यांनी आपल्या सहकार्याच्या उपस्थितीत सत्कार केला यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, उपसरपंच अलीम बेग पटेल, पोलिस पाटील इब्राहीम बेग सह आदी उपस्थित होते 

पटेल, रवींद्र पाटील भिलवंडे, ग्रामविकास अधिकारी नव्हारे, बालाजी भिलवंडे, नरसी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद टोकलवाड, जेष्ठ पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments