नायगाव तालुक्यातील मौजे कोठाळा येथे बारूळ मनार प्रकल्प विभागाच्या अपुऱ्या अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या स्टॉपमुळे या विभागा अंतर्गत येणाऱ्या कॅनलची दुरुस्ती करून तळ्याचे पाणी शेतकऱ्यांना सोडण्यात आले होतेसदरचे कॅनल कौठाळा जवळ फुटून गेल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याची नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन बातमी दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती आणि अधिकाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली होती
यासंदर्भात मारोतराव किशनराव पांढरे व्हाईस चेअरमन जय बळीराजा पाणी वापर संस्था कोठाळा यांनी नायगाव फास्ट न्यूजला सदरची माहिती दिली होती त्यांच्या मागणी नुसार प्रशासनाने कॅनल मधील खडा बुजविण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांच्या मागणीला यश मिळाले आहेनायगावच्या मानार प्रकल्प अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे चैन क्रमांक ३०० वर कॅनॉल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे कॅनल तुटून गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती
या बाबीची अधिकाऱ्यानी दक्षता घ्यावी अशी मागणी मारोतराव किशनराव पांढरे कौठाकर यांनी केली आणि नाम फाउंडेशनचे भा. ग मोरे यांनी अधिकाऱ्याशी चर्चा ही केली होती अखेर नायगाव फास्ट न्यूजच्या दणक्याने प्रशासन ताळ्यावर आले आहे -

0 Comments