नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांच्या आतापर्यंतच्या पत्रकारितेची दखल घेऊन झूम ऑन न्यूजचे संपादक नागनाथ होनमाने यांनी नांदेड प्रतिनिधी म्हणून निवड केलेली आहेजेष्ठ पत्रकार गंगाधर ढवळे यांची झूम ऑन न्यूजच्या जिल्हा प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार वसंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू उद्धवराव भोसले, रवींद्र पाटील चव्हाण यांनी सत्कार करून शुभेच्छा दिलेल्या आहेत
पत्रकार ढवळे यांची निवड झालेली समजतात नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू उद्धवराव भोसले, रवींद्र पाटील चव्हाण ,ज्येष्ठ साहित्यिक नारायण शिंदे आधी मान्यवरांच्या उपस्थितीत ढवळे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी जनता हायस्कूल नायगाव येथील विद्यार्थी ,विद्यार्थिनी, शिक्षक, पालक ,शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नायगाव फास्ट न्यूजचे मुख्य संपादक माधव पवार यांच्या पत्रकार संभाजी विठ्ठलराव वाघमारे, दिनेश राठोड यांनी ही पत्रकार गंगाधर ढवळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments