Header Ads Widget

व्यसनमुक्तीचे प्रचारक विठ्ठल देशमवाड यांनी गावातील स्मशानभुमीची समस्या सोडवण्याची केली मागणी.



हिमायतनगर नागोराव शिंदे पळसपुरकर 

 हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील रहिवासी तथा गेल्या २५ ते ३० वर्षापासून व्यसनमुक्तीचे अविरत कार्य करणारे विठ्ठल देशंमवाड हे मागील अनेक वर्षापासून समाजात वाढत असलेली व्यसनाधीनता कमी करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत 
खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा या विचाराने प्रेरित होऊन सकाळी उठणे दैनंदिन कार्यक्रम आटोपून आपल्या काखेत शबनम घेऊन त्यात संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज यांचे पुस्तक रुपी साहित्य घेऊन गावोगावी फिरतात भेटेल त्या तरुणांना मार्गदर्शन करतात त्यात देशसेवा असो सामाजिक कार्य असो अथवा व्यसनापासून अलिप्त होण्यासाठी ते मार्गदर्शन करत आहेत

संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चालण्याचा व ते अनुकरण करण्याचा सल्ला ते नेहमीच देत असतात असेच योगायोगाने ते आज दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी हिमायतनगर येथे भेटले आणि सामाजिक प्रश्नावर सांगोपांग चर्चा झाली मागील अनेक वर्षापासून व्यसनमुक्ती करण्यासाठी घेऊन फिरण्यात येणारी त्यांची शबनम या शबनमने त्यांच्या खांद्यावर कायमस्वरूपी ओळख निर्माण केली आहे
त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या कार्याने भारावून जात त्यांच्या खांद्यावरील ओझे माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी डोक्यावर घेऊन त्यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज असल्याची जाणीव मला झाली माझ्यासारखे कित्येक तरुण हे थोर साधू संत व महापुरुष यांचे विचारांपासून दूर जात असल्याने देशंमवाड यांनी चिंता व्यक्त केली
आगामी  काळात हिमायतनगर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये स्मशानभूमीचे असलेल्या प्रलंबित प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करून अनेक गावात स्मशानभूमीचा असलेला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी  नायगाव फास्ट न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितलेआहे

मागील काळात हिमायतनगर तालुक्यातील रेल्वे अंडरग्राउंड खालील रस्त्यासाठी त्यांनी उपोषण केले होते तो प्रश्न अगदी चुटकीसरशी त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने सोडवला होता आणि हिमायतनगर ते आंदेगाव पार्डी जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाखाली पक्का रस्ता तयार करून अनेक गावातील नागरिकांना दिलासा मिळवून दिला होता त्याच पद्धतीने हिमायतनगर तालुक्यातील स्मशानभूमीचा प्रश्नही  हाताळणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments