हिमायतनगर : नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासनाच्या पुरवठा विभागाच्या आदेशाचे पालन न करता मोफत मध्ये माल वाटप करण्याचे असताना लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन माल वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे
येथील सरपंच महिला सौ.अश्विनी कल्याणकर यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या हिताची गोष्ट म्हणून राशन दुकानदारास त्यांनी गावात आलेल्या राशन पुरवठा शासनाच्या नियमानुसार लाभार्त्यांना वाटप करा अशी तंबी राशन दुकानदार प्रभू पिटलेवाड यांना दिली.यावेळी गावातील शेकडो शिधापत्रिका धारक उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि एकंबा गावातील शिधापत्रिका धारकांच्या विविध तक्रारीची दखल घेत गावच्या सरपंच सौ.अश्विनी कल्याणकर यांनी स्वतः राशन दुकानदाराची चांगलीच कानघडणी केली आहे.तसेच पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारास दिलेल्या मशीन वरून निघणारी मालाची ऑनलाईन पावती शासनाच्या नियमानुसार देण्याचे आदेश असताना सुद्धा देत नसल्याने ते देण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे
कोणताही गरजू, गरीब यांना शिधा पासून वंचित राहता कामा नये. गरीब लाभार्त्यांना शिधापत्रिका तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात व माल पुरवठा करावा अश्या सूचना देखील यावेळी राशन दुकानदारास देण्यात आल्या आहेत
अन्यथा गावातील पत्रिका धारकांची तक्रार जर आली तर ग्रामपंचायत कार्यालयाकडे सूचना आली असता राशन परवान्या बाबत ग्रामस्तरावर करण्यात योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल. असे सरपंच यांनी सांगितले आहे.तसेच याबाबतची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून शासनाच्या नियमानुसार एकंबा गावातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करावा अशी मागणी होत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलल्या जात आहे.

0 Comments