शिवराज पा.होटाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने दि.८ जानेवारी रोजी नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यात भरगच्च कार्यक्रम साजरे होत असून सकाळी महारक्तदान व सायंकाळी ५ वा "गौरव शिवराजाचा जागर लोकसंस्कृतीचा"हा चित्रपट कलावंताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमाचा लाभ रसिक जनतेनी घ्यावे असे आव्हाहन शिवराज पाटील होटाळकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
दि.५'जानेवारी २०२३ पासूनच या वाढदिवस सोहळ्यातील कार्यक्रमाना सुरुवात झाली असून वाहतुक सुरक्षा मार्गदर्शन,सामान्य ज्ञान स्पर्धा ,दि.७ व ७ जानेवारी रोजी दररोज सायंकाळी ५ ते १० पर्यंत शालेय बालमहोस्तव घेण्यात आला आहे
---------------------------------------------------------------------
दि.८ जानेवारी रोजी सकाळ पासून नायगाव मतदार संघात भरगच्च कार्यक्रम होत असून सकाळी नरसी होटाळा शिवेवरील महादेव मंदिर येथे अभिषेक दुपारी १२ वा.साईबाबा मंदिर येथे महाआरती सकाळी १० वा कै डी.बी.पाटील होटाळकर कॉम्प्लेक्स समोर शिवराज पा.होटाळकर मित्र मंडळाच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रणिताताई देवरे चिखलीकर,राजेश कुंटुरकर,बालाजी बचेवार, यांच्या उपस्थितीत व शिवराज पा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते महान व पवित्र कार्य आहे. रक्तामुळे अनेकांना जीव गमवावा लागला याची उदाहरणे सर्वत्र आहेत काहीच्या कुटुंबात अंधार झाला असल्याची अनेक उदाहरणे ही या बाबतीत आहेत.
रक्तदान सारख्या महान अश्या कार्यामुळे आपले व इतरांचे जीवन कृतार्थ होते. एखाद्याचे जीव वाचविण्यासाठी नायगाव विधानसभेचे युवा नेते तथा माजी सभापती तथा भाजप जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन होटाळकर मित्र मंडळाचे पदाधिकारी गुरुनाथ शिंदे ,विकास पवार गोळेगावकर यांनी केले आहेसकाळी ११ ते सायंकाळी ५ वा पर्यंत मिलिनीयम स्कुल पटांगण येथे शुभेच्छाचा स्वीकार कोरोना महामारीच्या काळानंतर बऱ्याच दिवसा नंतर प्रथमच चित्रपट कलावन्त रुपाली पाटील,मिरा जोशी,एशवर्या बडदे,मीरा जगनाथ,सुप्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर,गायक अमित काकडे,विनोदी कलावन्त बालाजी सुळ,यांच्या सह आरती दीक्षित यांचा आर्केस्ट्रा रसिकांच्या सेवेत आपली कला सादर करणार आहेत.
मिलिनीयम इंग्लिश स्कुल पटांगण येथे होणाऱ्या याच कार्यक्रमात शिवराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.या सर्व कार्यक्रमास येण्याचे आवाहन मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश पवार व कार्याध्यक्ष गंगाजी पाटील मुगावकर,सचिव राहुल पाटील नकाते,कोषाध्यक्ष कुमुद पटेल,संघटक मनू हिवराळे,या सहसर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

0 Comments