Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नापिकीला कंटाळून रुई बु येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या - पोलिसांनी केला पंचनामा -


     माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे रुई बु येथील रहिवासी असलेल्या एका गरीब कुटूंबातील ३५ वर्षीय शेतकऱ्यानी सततच्या नापीकीला कंटाळून हिळ्याच्या झाडाला पांढऱ्या रंगाच्या तीन ते चार फुटाच्या दस्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ठिक ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली आहें तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 
रुई बु पासून जवळ असलेल्या शिवाररात असलेल्या धूऱ्यावर गट क्रमांक ७३ मधील संभाजी गणपाती पाटील महागावे यांच्या शेतात सदरच्या शेतकऱ्यांनी सततच्या नापीकीला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्या पायात काळा रबरी बूट अंगात काळा पॅन्ट अंगात शांडो बन्नान होती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर लक्ष्मण गंगातिरे असे होते
रुई बु येथील सदरच्या शेतकऱ्यांना अर्धा एकर जमीन असल्याचे सांगण्यात येते सततच्या नापिकीमुळे नेहमी कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी नेहमी हैराण होत होता दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी बाहेर जाऊन येतो म्हणून घरातून गेले होते आणि त्यांच्या कुटूंबातील नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु मिळून आला नाही परंतु दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहें 

असल्यामुळे सदरची माहिती कुंटूर पोलिसांना माहिती दिल्या वरून सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार कुमरे व घुमे यांनी पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन शेवविच्छेदन करण्यासाठी नायागांवच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले आहे 

Post a Comment

0 Comments