नांदेड शासकीय रुग्णालयाच्या प्रशासकीय यंत्रनेच्या बेजबाबदार पणामुळे विष्णू पुरीच्या दवाखान्यात रुग्णाला गेल्या आठ दिवसा पासून पाणी मिळत नसल्याचे थेट वास्तव चित्र रुग्णालयातील आहे
---------------------------------------------------------------------
सामाजिक कार्यकर्ती सौ महादेवी मठपती युवती प्रमूख भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड यांनी रुग्णालयातील महिलाची भेट घेऊन सोयी सुविधेच्या संदर्भात विचार पूस केली असल्यामुळे या कडे जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देतील का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे
नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात गेल्या आठ ते नऊ दिवसा पासून पाणी मिळत नसल्यास छोटया बालकाच्या माता आपल्या बाळाला दवाखान्यात ठेवून पाणी आणण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याच्या सदरच्या व्हिडीओ द्वारे माहिती दिल्या आहेत
नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात मोठं मोठया सुविधा केल्या जात असल्याचे सांगण्यात येत परंतु प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे रुग्णालयात रुग्णासाठी पाणी मिळत नसेल रुग्णाचे काय असा प्रश्न रुग्णातुन उपस्थितीत केला जात आहे
शासन एका बाजूने शासकीय दवाखान्यात औषध वपाण्याची कमतरता पडू नये म्हणून प्रयत्न करत असताना दुसरी कडे या दवाखान्यातील रुग्णाच्या नातेवाईकांना व रुग्णाला पाण्यासाठी बाहेर जावे लागत आहे
अशा या गंभीर बाबीकडे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णाची होत असलेली हेळसांड थांबविली पाहिजे असी मागणी सौ महादेवी मठपती युवती प्रमूख भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड यांनी जिल्हाधिकारी राऊत यांची भेटून निवेदन देणार असल्याच्या नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहेत

0 Comments