Header Ads Widget

उद्या प्रजासत्ताक दिनी सरस्वती देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या रोषणाईने साजरी होणार!!



नागोराव शिंदे :
पळसपुरकर

विद्येची देवता माता सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे माता सरस्वती देवीच्या कृपाशीर्वादाने हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बुद्रुक गावातील माता सरस्वती देवीचे उपासक दिगंबरराव देविदासराव माने देशमुख पोटेकर त्यांचे सुपुत्र डॉक्टर विठ्ठलराव दिगंबरराव माने देशमुख यांनी उदार अंतकरणातून माता सरस्वती देवीचे मंदिराचे बांधकाम स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून माता सरस्वती देवीचे भव्यदिव्य मंदिर उभारले आहे 

मंदिरातील माता सरस्वती देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व मूर्ती स्थापना मोठ्या उत्साहात येत्या २६ जानेवारी गुरुवार दिवशी देवीचा जीर्णोद्धार होणार असून त्या कार्यक्रमानिमित्ताने पोटा व पोटा परिसरातील भाविकांसाठी नगर भोजन महाप्रसादाचे आयोजन केले आहे

विद्येची देवता माता सरस्वती देवीच्या कृपाशीर्वादाने दिगंबरराव देवदास राव माने देशमुख यांच्या परिवारावर देवीची कृपादृष्टी असल्याने त्यांच्या कुळाचा जिर्णोद्धार झालेला असल्यामुळे हीच एक बांधिलकी म्हणून विद्येची देवता माता सरस्वती देवीच्या मंदिराचे भव्य दिव्य बांधकाम करून लाखो रुपये खर्च करण्यात आले आणि भव्य मंदिर गावकऱ्यानी उभारले आहे 

माता सरस्वती देवीचा जुर्णोद्धार करण्यासाठी पोटा नगरीचे सुपुत्र दिगंबरराव माने देशमुख व त्यांचे सुपुत्र डॉक्टर विठ्ठलराव माने देशमुख यांनी स्वखर्चातून लाखो रुपये मंदिराच्या बांधकामासाठी उपलब्ध करून विशाल असं मंदिर उभारले आहे त्याच मंदिराची प्राणप्रतिष्ठा दिनांक  २६ जानेवारी २०२३ रोजी होम यज्ञ हवन करून पाच ब्राह्मणांच्या हस्ते हिंदू धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे माता सरस्वती मंदिरात देवीची मूर्तीची स्थापना होणार आहे  

 पोटा परिसरातील तांडया वाड्यातील  भाविक भक्त साठी नगर भोजनाची व्यवस्था केली आहे देशमुख यांनी पोटा बुद्रुक येथे एकंदरीत चार मंदिराचे बांधकाम स्वतःच्या कष्टातून उभारले आहे पहिले मंदिर गणेशाचे दुसरे मंदिर तुकामाईचे तिसरे मंदिर दत्तप्रभू  मंदिराचे कलशारोहण केले 

चौथे मंदिर माता सरस्वती विद्येची देवता असणाऱ्या देवीचे भव्य दिव्य मंदिर बांधून हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक गावाचे नाव डॉक्टर विठ्ठलराव माने देशमुख यांनी रोशन केले आहे... परिसरातून माने देशमुख यांचे धार्मिक कार्याबद्दल  कौतुक होत आहे 

असेच धार्मिक कार्य माने  देशमुख परिवाराच्या हातून घडो असा शुभ आशीर्वाद माता सरस्वती देवीने त्यांना दिला आहे तसेच या भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रमाला गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी उपस्थितीत राहावे तसेच मातेच्या स्थापणे नंतर महाप्रसादाचा भाविक भक्तांनी आस्वाद घ्यावा असे आव्हान डॉक्टर विठ्ठलराव दिगंबरराव माने देशमुख यांनी  केले आहे

Post a Comment

0 Comments