जनता हायस्कूल क.म.वी. नायगाव येथे जिल्हा पातळीवरील कै. अमृतराव पाटील चव्हाण वकृत्व स्पर्धा दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात आजच्या युगातील विद्यार्थ्यापुढे नोकरी मिळवण्याचे आवाहन यावेळी केले असून ते त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून साध्य करावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री उद्धवराव भोसले यांनी केले आहे
यावेळी त्यांनी जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की स्पर्धा परीक्षेचे सुरुवात हि शालेय जीवनापासूनच सुरुवात करावी. त्यामुळे त्यांचे ध्येय साध्य होईल. वकृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण हे होते. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी आपल्या बालपणीच्या शिक्षणाच्या अडचणीचा उल्लेख करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी कर्मयोगी कै. बळवंतराव पाटील चव्हाण यांनी कठीण परिस्थितीतून एज्युकेशन सोसायटी नायगावची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत
-----------------------------------------------------------------------
वैद्यकीय शिक्षण वगळता शिक्षणाच्या सर्व सोयी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी होत आहे हे सांगताना मनस्वी खूप आनंद वाटतो असे प्रकर्षाने नमूद केले केले.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणात जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव सूर्यवंशी यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्वच्छ व सुंदर परिसर, स्कॉलरशिप, नीट व सीईटी मार्गदर्शन, इयत्ता बारावी साठी जीनियस बॅच आदि विविध उपक्रमांची माहिती दिली व आपल्या कार्याचा लेखाजोखा उपस्थिता समोर मांडला.
-----------------------------------------------------------------------
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. नारायण शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत त्यांनी आपले प्रथम ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करावे असे आवाहन केले. वरील कार्यक्रमात इयत्ता दहावी, इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व उच्च माध्यमिक व्यवसायिक अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी तसेच मागील वर्षी नीट च्या परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी, स्कॉलरशिप धारक विद्यार्थी एन. एम. एम. एस. मधील उत्तीर्ण विद्यार्थी आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला.
व्यासपीठावर एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री गोविंदराव मेथे, नायगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ मीनाताई सुरेश कल्याण, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य केशवराव पाटील चव्हाण, हनुमंतराव पाटील चव्हाण, माजी प्राचार्य ह. स. खंडगावकर, शं. ल. अजनीकर, दत्ता पाटील होटाळकर, प्रल्हाद पाटील होटाळकर, हनुमंतराव सुजलेगावकर, प्राचार्य डॉक्टर के. हरिबाबू, प्राचार्य मारुती माने, प्राचार्य क्षीरसागर सर, वकृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आलेले प्रा. हेमंत बावणे, प्रा. रामदास बोकारे, केंद्रप्रमुख उद्धव ढगे आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
वरील कार्यक्रमास उपप्रचार्य प्रा. प्रभाकर पवार, उपमुख्याध्यापक सा. रा. जाधव, पर्यवेक्षक सरगुले एम. एस. डॉ गणेश देवडे, यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे संयोजक श्री वसंत माने प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे यांच्यासह प्रा. माधव बावलगावे, प्रा. गजानन शिंपाळे, प्रा. माधव जाधव, शरद जोनकले ,हनमंते सर,क्रीडा शिक्षक सय्यद अयूब, संजय मलमवार, प्रा. संगमेश्वर शिंदे , आनंद गायकवाड, शिवराम चव्हाण, गोवर्धन जाधव, शेख हसन, श्रीराम चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. वरील कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा उत्तम पाटील यांनी केले तर शेवटी प्रा पी डी जाधव बारूळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 Comments