बीड विरोध नांदेड असा सामना रंगल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याच्या नायगाव व बिलोली तालुक्याच्या महसूल प्रशासनातील दमदार जोडीने दमदार यश प्राप्त करणारे नायगाव महसूल सहाय्यक शेख इनुस समदानी यांच्यासह बिलोलीचे अव्वल कारकून राजू रामदास आलमवाड यांनी सदरच्या सामान्यात नांदेड जिल्ह्यालाना बहुमान मिळवून दिला आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या वतीने सदरच्या खेळाडूचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला आहे
---------------------------------------------------------------------
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी
यांनी दिनांक १५ जानेवारी२०२३ रोजी रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान बॅडमींटन इंडोर हाॅल नायगाव येथे अव्वल करकून उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोलीचे राजू रामदास आलमवाड यांच्यासह व शेख इनूस समदानी महसूल सहाय्यक तहसील कार्यालय नायगाव या जोडीचा सत्कार करण्यात आला आहे
विभागीय महसुल क्रीडा स्पर्धेत प्रथम विजेते पद पटकाविल्या बदल सत्कार करण्यात आला असून दोन्ही बॅडमिंटन पटूचे नायगाव बॅडमिंटन संघा तर्फ सत्कार व सन्मान करण्यात आला असून त्यावेळी सपोनि महादेव पुरी आशिष गोरटेकर सतीष लोकमवर गणेश नायगावकर कपिल गरटे रूपेश बोकारे व इतर बॅडमिंटन संघ मधील खेळाडू यांच्या वतीने सत्कार करण्यात आले आहे

0 Comments