Header Ads Widget

कोलंबीत सगर पुत्र महातपस्वी राजा भगीरथ यांची जयंती साजरी


विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-           

 सगर पुत्र महातपस्वी राजा भगीरथ यांची जयंती दि.१५ जानेवारी २०२३ रविवारी मकर संक्रांतीच्या पर्वावर   कोलंबी येथील सगर समाज बांधव व राजाभगिरथ मंडळ कोलंबी यांच्या पुढाकारातून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभीरभन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांचे प्रतिनिधी गोपाळ महाराज हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक व युवा उद्योजक प्रवीण बियाणी व युवानेतृत्व विधानसभा नायगाव बंडू पाटील चव्हाण व प्रमुख व्याख्याते राणाप्रतापसिंह चंदावाड सर होते. महातपस्वी राजा भगीरथ जयंती यांच्या निमित्त युवा नेतृत्व बंडू पाटील चव्हाण बोलत असताना महापुरुषांचे विचार आपल्या आचरणात आणावे व युवकांनी आपल्या आई-वडलांची सेवा करावी असे प्रतिपादन केले 

गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचे प्रतिनिधी प्रल्हाद  गोविंदराव बैस,उपसरपंच प्रतिनिधी ज्ञानोबा गवाले ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लांडगे, नब्बीसाब शेख, भगवान लांडगे,साहेबराव मुधळे,जयवंतराव बर्लेवाड,अशोक गुरुजी व तंटामुक्ती अध्यक्ष भिवा पाटील शिंदे आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक बालाजी सोनमनकर(काटकर), गणेश सोनमनकर(देवकर), दादाराव पाटील शिंदे, सुदाम लांडगे,कोंडीबा बुरपल्ले
(माजी सरपंच),उद्धव पाटील बैस,माजी सरपंच उत्तम गवाले,दत्ता पाटील शिंदे शिवदत्त पोतलवाड, हणमंत पोतलवाड,आत्माराम कोकुर्ले, मारोती बर्लेवाड,परसराम कोकुर्ले ,विठ्ठल पोतलवाड, उद्धव पोतलवाड, मनोहर गुरुजी बुरपल्ले,नरसिंग पोतलवाड गोपाळ पोतलवाड, राधाकिशन पोतलवाड, रमेश बर्लेवाड.आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद गुरुजी पानगटवाड यांनी केले.
     
या कार्यक्रमाचे आयोजन  व कार्यक्रम यशस्विते साठी राजा भगीरथ मित्र मंडळ कोलंबी अध्यक्ष प्रताप पोतलवाड व उपाध्यक्ष शुभम बर्लेवाड व निरंजन पोतलवाड, गोपाळ चिंतेवाड (सचिव),हणमंत घोनशेटवाड,व्यंकोबा पोतलवाड, बजरंग कोंडेवाड,संभाजी मरडे, ज्ञानेश्वर कोकुर्ले,मारोती पोतलवाड,कृष्णा काटमवाड,सूर्यकांत सावरगावे,कोंडीबा घोनशेटवाड,रवी बुरपल्ले,नामदेव चित्तरवाड,हणमंत कोकुर्ले, हणमंत पोतलवाड, प्रदीप बर्लेवाड,ज्ञानेश्वर घोनशेटवाड व समस्त सगर समाज बांधव आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments