Header Ads Widget

उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांच्या कडून रुई बु येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियाना आर्थिक मदत !!

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील मयत शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण गंगातिरे यांनी दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती त्यांच्या कुटूंबियाची दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी उद्योग समुहाचे विद्यमान चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेस पक्षाचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या कडून रुईच्या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत केली आहे 
तालुक्यातील रुई बु येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबाला धीर सोडू नका असे सांगत त्यांचे सांत्वन केले शेतकऱ्यांची पत्नी श्रीमती सुमित्रा ज्ञानेश्वर गंगातिरे, श्रया ज्ञानेश्वर गंगातिरे मुलगी, लक्ष्मण ज्ञानेश्वर गंगातिरे यांना विद्यमान कवळे गुरुजीच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन गंगातिरे परिवाराच्या दुःखात आवर्जून भेट दिली आहे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हणमंतराव पांडे, माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे, श्रीकांत भाऊसाहेब देशमुख, प्रकाश पाटील,पत्रकार दैनिक प्रजावाणीचे तथा नायागांव फास्ट न्यूजचे पत्रकार माधव पवार, सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे, गजानन गंगातिरे दत्ता गोरटकर,दादाराव पाटील पवळे ( पि ए ) परमेश्वर इंगळे, दशरथ गंगातिरे, माधव गंगातिरे, पप्पू पाटील शिंदे, गोविंद गंगातिरे, संतोष गंगातिरे यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments