Header Ads Widget

पत्रकार माधव चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

        माधव पवार
नायगाव येथील रहिवासी असलेले जेष्ठ पत्रकार तथा जन सामान्य माणसाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणारे चव्हाण परिवारातील माधव व्यंकटराव चव्हाण यांना नुकताच कै. दुर्गादास सराफ प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदरचा पुरस्कार घोषित करण्यात आल्यामुळे नायागांव तालुक्याच्या पत्रकाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहें
नायगाव येथील रहिवासी पत्रकार माधव चव्हाण हे गेल्या १५ वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय काम काम करून समाजात एक सूजळ प्रतिमा दाखवून देत अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याची कामगिरी चव्हाण हे करीत आहेत पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र टी व्ही चॅनेलचे उपसंपादक विलास आठवले दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक सिने अभिनेता सयाजी शिंदे आणि दैनिक उद्याचा मराठवाडाचे उपसंपादक राम तरटे  अन्य पत्रकारासह नायगाव येथील पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा दैनिक गाववाला वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार माधव चव्हाण आहेत 

पत्रकार माधव व्यंकटराव चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ पत्रकरिता पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments