नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रहिवासी असलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंटजवळ असलेल्या उड्डाण पुलावर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात महिलेच्या डाव्या दंडा मधून गोळी गेल्याचे सांगण्यात येते सदरच्या महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले आहेइतवारा पोलीस निरीक्षक धबडगे यांना सदरची माहिती कळताच आपला पोलीस फौज फाटा घेऊन घटना स्थळी रवाना झाले व नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांना सदरची ही माहिती देण्यात आली आहे
-------------------------------------------------------------------
नांदेडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कार्यकाळातील नूतन वर्षातील पहिली घटना असल्यामुळे बाफना उडान पुला जवळ गोळी बाराने थरारक घटना घडली असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यानी रुग्णालयात जाऊन काँग्रेसच्या जखमी सविता गायकवाड यांची भेट घेतली असली असल्याचे सांगण्यात येते
शहरातील शक्तीनगरच्या भागात राहणाऱ्या सविता गायकवाड हिने तिच्या दुचाकी वरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या असे सांगण्यात येते ११ वाजून १५ मिनिटांनी बाफनाच्या उड्डाण पूलाजवळ आली पाठी मागून एका मोटार सायकल वरून ३ जण आले यात रहीम खान आणि जफर या परभणीच्या दोघांसह आणखी एक जण होता असे सांगण्यात येते
काँग्रेसच्या सविता गायकवाड यांना थांबवले होते ओळख असल्यामुळे सविता गायकवाड थांबल्या. यावेळी त्यांनी वाद घातला त्यांच्या जवळ असलेल्या पिस्तूलने सविता गायकवाड यांच्यावर गोळी केले

0 Comments