Header Ads Widget

बारूळच्या तळ्याचे पाणी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना बेजबाबदार पणामुळे कौठाळा येथे कॅनल फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले - शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या मारोतराव पांढरे यांची मागणी -

      माधव पवार
बारूळ मनार प्रकल्प विभागाच्या अपुऱ्या अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या स्टॉपमुळे या विभागा अंतर्गत येणाऱ्या कॅनलची थातूर मातुर दुरुस्ती करून तळ्याचे पाणी शेतकऱ्यांना सोडल्यामुळे नायगाव तालुक्यातील मौजे कौठाळा जवळ सदरचे कॅनल फुटून शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्यामुळे मोठे नुकसान होऊ नये यांची अधिकाऱ्यानी काळजी घेऊन तात्काळ कॅनल बुजून घ्यावेत अशी मागणी होत आहे
यासंदर्भात मारोतराव किशनराव पांढरे व्हाईस चेअरमन जय बळीराजा पाणी वापर संस्था कोठाळा यांनी सांगितले आहे
---------------------------------------------------------------------
नायगावच्या मानार प्रकल्प अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चैन क्रमांक तीनशेवर कॅनॉल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे कॅनल तुटून गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊ नये व मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यांची अधिकाऱ्यानी दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे
---------------------------------------------------------------------
तालुक्यातील पाटबंधारे विभागा अंतर्गत येणारे बारूळ मानार प्रकल्पाच्या अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्यांच्या हिवाळी लागवडीसाठी तळ्याचे सोडण्यात आले परंतु तळ्याचे मोठया स्पीडने वाहिल्यामुळे पुढे कॅनल ना दुरुस्त असल्यामुळे कौठाळा येथे कॅनल फुटून थेट पाणी शेतकऱ्यांना शिवारात शिरले आहे

कौठाळा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती मारोतराव पांढरे यांनी दिली सदरची नुकसान भरपाई मागील काळात देण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले आहें

Post a Comment

0 Comments