शहरी भागात असो ग्रामीण भागात असो अथवा खेड्या पाड्यात असो सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन व वधू वर परिचय मेळावे घेणे व करणे ही काळाची गरज असल्याचे मत नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शुभ आकड्यात एकूण आकारा सामूहिक वधू वर मेळावा संपन्न झाला त्या त्या विशेष कार्यक्रमा दरम्यान शुभेच्छा देताना आपले मत व्यक्त केले आहे
" नामांकित पत्रकाराचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार "
पत्रकार माधव पाटील चव्हाण यांना नुकताच दुर्गादास प्रतिष्ठान मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असल्यामुळे विचार मंचावर शाल श्रीफळ देऊन मराठा सेवा संघ नायगावच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहे
ग्रामीण भागात सुद्धा असे भव्य वधू वर परिचय मेळावे त्याच बरोबर सामूहिक विवाह सोहळ्यात विशेष आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यानी लक्ष देऊन असे भव्य कार्यक्रम आयोजित केल्यास निश्चित खर्च वाचेल आणि शासन दरबारी नोंद होऊन गावकऱ्याचा सन्मान वाढेल असे ही माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सांगितले असून या पुढे ही वधू वर परिचय व सामूहिक विवाह सोहळा घडवून आणने अतिशय महत्वाची बाब असल्याचे ही मा. आ. वसंतराव चव्हाण म्हणाले आहेवधू वर मेळाव्याच्या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा मा.भास्करराव पाटील खतगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मीनाताई सुरेश पाटील कल्याण, गट शिक्षणाधिकारी एम.जे. कदम सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत पाटील सुगावे, श्रावण भिलवंडे, संभाजी भिलवंडे, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, भाजप तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील, सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शेरा पाटील, जिल्हाध्यक्ष उद्भव सुर्यवंशी आदी उपस्थित होते जिल्हा संघटक डॉ.जीवन चव्हाण सर, पत्रकार माधव चव्हाण, गजानन चौधरी, आणि कार्यक्रमाचे आयोजक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पवळे, उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण, सचिव संतोष कल्याण, कार्याध्यक्ष डि.टी. जाधव, नागेश पाटील कल्याण, जे.डी. पाटील रातोळीकर, टि.जी. पाटील रातोळीकर, आनंद पवार, विजय पाटील जाधव, व्ही.सी.जाधव, अशोक पाटील कल्याण, निळकंठ पाटील शिंदे, आदी उपस्थित होते
याप्रसंगी उपस्थित मान्यवरां कडून मराठा सेवा संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले व या पुढे ही असेच कार्यक्रम केले पाहिजे आणि सदरील कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन हणमंतरावजी जाधव यांनी केले आहे

0 Comments