Header Ads Widget

कै.नागोराव कोनापूरे यांच्या पुण्यतिथीनिमित्य भजनसंध्या संपन्न !!

     माधव पवार 
उमरदरी येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते कै.नागोराव माधवराव कोनापूरे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्य तेलूर येथील हनुमान भजनी मंडळांनी रात्रभर अभंग,गौळण,भावगित सादर करुन जागर केला आहे

उमरदरीच्या माजी सरपंच श्रीमती मोहनाबाई कोनापूरे, पत्रकार शिवाजी कोनापूरे, माधवराव कोनापूरे, सौ.कमलबाई परसे, निर्मलाबाई मुंडकर,मंगलबाई पा.कौटकर व सिडको नांदेड येथील सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्या आशाताई सुरेश बोरकर व गावातील बहुसंख्य महिला भगिनिंनी अभिवादन केले
रात्री कौठा व तेलूर येथील हनुमान भजनी मंडळींनी हरी जागर केला. कौठा येथील ज्येष्ठ गायक ह.भ.प. बसवंतराव देशमुख,बालाजी मुंडकर,दिगंबर बरगले,गोविंद बरगले तसेच तेलूरचे ह.भ.प.रामु पा.कौटकर,मारोती पा.मुंडकर, विठ्ठल पा.कौटकर,शंकर पा. मुंडकर,बालाजी पा.मुंडकर, देवराव दावलमलके,मृदंगाचार्य शिवराज मुंडकर,शिवाजी पा.मुंडकर,बालाजी पा.मुंडकर, महिला भजनी मंडळाच्या सौ.पारुबाई ऊर्फ निर्मलाबाई पा.मुंडकर,चतुराबाई पा.कौटकर, आदीने उत्कृष्ट पणे सादर केले आहे 
सोमित्राबाई पा.कौटकर, धोंडुबाई डुबुकवाड,धुरपतबाई पा.काकडे व सर्व गायक,वादकांनी रात्रभर अभंग,गौळण,भावगित,भक्तिगीते सादर करुन उमरदरी व परिसराला भक्तीरसात न्हाऊन काढले.उपस्थित सर्व महाराज मंडळींचा सत्कार माजी सरपंच मोहनाबाई नागोराव कोनापूरे, सौ.गोदावरी कोनापूरे,सौ.प्रेमला कोनापूरे,सौ.संगीता कोनापूरे, विवेक कोनापूरे,सौ.मोनिका विजय कोनापूरे,सौ.विजयमाला रामकिशन परसे व राजू कोनापूरे यांनी केला.

Post a Comment

0 Comments