विशेष नायगाव प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
नायगावच्या नगराध्यक्षपदा साठी माजी आ.वसंत चव्हाण यांच्या बाजूच्या काँग्रेसच्या एक मेव मीनाताई सुरेश पा.कल्याण यांचे नामांकन दाखल झाले असून येत्या नविनवर्षात म्हणजे २ जानेवारी २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षते नगर पंचायत सभागृहात नवीन अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया साठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
नायगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. गीता नारायण जाधव यांनी दि.२० डिसेंबर २०२२ रोज मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सादर केला .या नंतर नूतन नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम लागला असून २७ डिसेंबर रोजी मीनाताई सुरेश कल्याण यांचा एकमेव अर्ज आल्याने आमच्या विशेष प्रतिनिधीने वर्तविलेल्या अंदाजानुसार सौ कल्याण यांचीच निवड निश्चित मानली जात आहे.
-------------------------------------------------------------------
नायगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असताना सौ. जाधव यांनी केवळ दहा महिन्यांनंतर राजीनामा दिला यामुळे पूर्वी ठरल्या प्रमाणे अडीच वर्षात तीन नगराध्यक्ष प्रत्येकी १० महिने या प्रमाणे अडीच वर्षात तीन नगराअध्यक्ष नायगाव वासीयांना मिळत आहेत
-------------------------------------------------------------------नायगाव नगरपंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक असून हे सर्व सदस्य माजी आमदार तथा कांग्रेस नेते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंकचे अध्यक्ष वसंत चव्हाण यांच्या नेत्रत्वात निवडून आलेल्या आहेत.सर्वसाधारण महिला साठी अध्यक्ष पद सुटल्याने पहिला क्रमांक गीता जाधव यांचा लागला दुसऱ्या क्रमांकाने त्यांच्या जागेवर सौ. मीनाबाई सुरेश कल्याण यांची वर्णी लागणार हे निश्चित झाली आहे मीनाताई या माजी आ.बापूसाहेब गोरठेकर यांच्या विहिन बाई आहेत
-------------------------------------------------------------------
एके काळी विरोधात असणारे कल्याण- चव्हाण परिवार नगर पंचायत नीवडणुकीत एकत्र आले आणि ठरल्या प्रमाणे नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत कल्याण परिवाराच्या मीनाताई यांना नगराध्यक्ष पद निश्चित झाले. या नंतरच्या दहा महिन्याला अर्चना संजय चव्हाण यांची वर्णी लागणार हे निश्चित आहे.या दोहो माजी आ.चव्हाण यांच्या गटाच्याच आहेत. त्यामुळे या नगरपंचायतवर चव्हाण गटाचे वर्चस्व कायम राहणार आहे.
-------------------------------------------------------------------
नगरपंचायतच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. यावेळी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी हे पद राखीव आहे. सौ. गीता जाधव यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्यामुळे आता ही संधी मीनाताई कल्याण यांच्या कडे आली आहे
---------------------------------------------------------------------
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ ब १ प्रमाणे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारबिलोली यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली आहे.दि ३० डीसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची ता असून २ जानेवारी म्हणजे नवीन वर्षात नूतन अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया नगर पंचायत सभागृहात पार पडणार आहे.या साठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

0 Comments