Header Ads Widget

सार्वजनिक बांधकाम विभागासह केटी कन्ट्रक्शन बेजबाबदारपणामुळे काहाळा ते गडगा रस्त्यावर असलेल्या सोमठाणा येथे गती रोधक करा - अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ?

  
       माधव पवार
सार्वजनिक बांधकाम विभागासह केटी कन्ट्रक्शन  बेजबाबदारपणामुळे काहाळा ते गडगा रस्त्यावर असलेल्या सोमठाणा येथे गती रोधक करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जनतेसह संभाजी बी ग्रेडने दिला आहे
---------------------------------------------------------------------
संभाजी बीग्रेड चे नायगाव तालुका उपाध्यक्ष आनंदराव बाबुराव शिंदे सोमठाणकर यांनी गर्दीच्या ठिकाणी गती रोधक बसविले नसल्यामुळे संताप व्यक्त करीत सदरच्या निष्क्रिय यंत्रणा काही अनुचित प्रकार सोमठाणासह काहाळा खुर्द येथे घडल्यास जवाबदार राहतील गतिरोधक दोन दिवसात बसवा अन्यथा संभाजी बीग्रेडच्या वतीने तीव्र आंदोलन ठेवण्याचा इशारा नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे 
---------------------------------------------------------------------
गडगा ते काहाळा या मार्गांवर मौजे सोमठाणा येथे दीनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय व रस्त्या लगत जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे या शिक्षण घेण्यासाठी मोठया प्रमाणात विध्यार्थी येत आहेत
तालुक्यातील व सोमठाणा हे गाव दीनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी प्रचार्य मनोहर पवार यांचे असल्यामुळे प्रसिद्ध असून गेल्या वर्षी शासनानी कोठी वधी रुपये खर्च करून हाय फाय बनविला आहे
---------------------------------------------------------------------
परंतु याच गावांत सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायागांवच्या हलगर्जी पणामुळे गती रोधक बसविले नसल्याने या रस्त्यावर बेबहान वाहने जाताना दिसून येत आहे
गडगा ते काहाळा रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक वाढली असल्यामुळे जनतेला व नागरिकाना रस्ता ओलांडून जात असताना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे चित्र सदरच्या व्हिडीओ मध्ये स्पष्ट चित्र दिसत आहे
---------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायागांव व के टी कन्ट्रक्शनच्या बेजबादार यंत्रनेने तात्काळ गती रोधक बसवून दयावेत व भविष्यात होणारा अपघात टाळावे असे जनतेनी मागणी केली आहे
सोमठाणा येथील बस्टँड जवळ या दोन दिवसात गती रोधक नाही बसविल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून सदरील विभागाच्या यंत्रनेने आणि ठिकाणी राज्य महामार्गांवर सुद्धा गती रोधक बसविले नाहीत त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच पाऊल उचलून गती रोधक बसविने गरजेचे आहे 


Post a Comment

0 Comments