माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या तीस ते पस्तीस वर्षा पासून धूळखात पडले असताना सुद्धा सदरच्या अधिकाऱ्यानी दुर्लक्ष करत असल्यामुळे शासकीय गोदामाच्या पटांगणात देशी दारू ढोसणाऱ्या बेवड्याचा अड्डा बनला असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेतालुक्यातील बरबडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांच्यासह गावकऱ्यानी सदरचे धूळखात पडलेले शासकीय गोदाम हे महिला बचत गटाला देऊन बचत भवन नावाने कार्यन्वित करावे असी मागणी होत आहे
---------------------------------------------------------------------
शासकीय गोदान ग्रामपंचायतच्या अंतर्गत येते त्यामुळे सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यानी पंचायत समितीच्या माध्यमातून येत असलेल्या निधीतुन गोदामाची दुरुस्ती करावी असी ही मागणी होत आहे
बरबडा गावचे सरपंच विद्यामान माधवराव कोलगाणे यांच्यासह उपसरपंच सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांचे प्रतिनिधी दिलीपराव धर्माधिकाऱ्यानी गावच्या विकासासाठी जास्तीचे प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येते आहे
महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक वेळा सदरचे धूळखात पडलेले गोदाम महिला बचत गटाला देण्यात यावी म्हणून मागणी केल्याचे सांगण्यात येत असून सदरच्या गोदामाची साफ सफाई करण्यासाठी पाच ते दहा हाजार रुपये अपेक्षित आहेत

0 Comments