Header Ads Widget

देशासह महाराष्ट्र राज्य कृषी प्रधान देश असल्यामुळे या देशात ९९ टक्के लोक शेतीवर आवलंबून ॲड अविनाश निलंगेकर

   
      माधव पवार
महाराष्ट्र राज्य हे टॉप मोस्टवर असल्यामुळे कृषी प्रधान राज्य आहे आणि राज्यात पीक व्यवस्था बरोबर होत नाही त्यावेळी राज्यात आर्थिक चणचण होत असते आपला देश हा कृषी प्रधान देश असल्याने या देशाची अर्थ व्यवस्था ९९ टक्के शेतीवर आवंलबून असल्याचे जेष्ठ वकील अविनाश निलंगेकर यांनी अर्थ व्यवस्थे बदल सखोल माहिती सांगितले आहे 
भारतीय अर्थव्यवस्था मुख्यत कृषी या क्षेत्रावर आधारित आहे अर्थ शास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषया अंतर्गत होतो
राज्यातली उत्पदान क्षमता वाढविण्यासाठी कंपण्याच्या माध्यमातून सेंटरचा केंद्रीय कायदा आहे त्यावर वेगवेगळ्या कंपण्या प्रक्रिया करून राज्य उत्पादन करते आणि इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करण्यासाठी उत्सुक राहत असतात इथे पणन विकास महामंडळ फल उत्पादन महासंघ असल्याचे त्यांनी सांगितले आहे भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा १९५० ते ५१ मध्ये १७.७  टक्के होता तो सन २०१६ ते १७ मध्ये १५.५  टक्के झाला आहे.

कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे व  असंघटित क्षेत्र आहे. कृषी व्यवसाय हा एकच असा प्रमुख व्यवसाय आहे ज्याच्यावर आयकर आकारला नाही असे जेष्ठ वकील अविनाश निलंगेकर यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments