Header Ads Widget

नायगाव बाजार समितीने उभारला मांजरम येथेपेट्रोल पंप बाजार समितीची स्वयं सिद्धतेकडे वाटचाल.


विशेष नांदेड प्रतिनिधी : एस एम मुदखेडकर 

नायगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने  उपबाजार पेठ मांजरंम येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. सोलापूर यांच्या कडून मंजूर करवून घेतलेले पेट्रोल पंप नववर्षाच्या पूर्वसंध्येला  कोलंबी मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्री यदुबन महाराज यांच्या  हस्ते  दि २९ डिसें रोजी उद्घाटन करण्यात आले. गत वर्षी गुडीपाडव्याच्या दि२ एप्रिल२०२१ या शुभ मुहूर्तावर नायगाव बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी. आ. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन  करण्यात आले होते
गडगा -कहाळा - मुदखेड (रेल्वे) रोडवरील मांजरंम येथे नायगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. सोलापूर यांच्या कडून नायगाव बाजार समितीच्या अथक परिश्रमातून डिझेल व पेट्रोल पंप अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पेट्रोल पंप उभारण्यात आला. पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवाना व बांधकाम पूर्ण करून आज दि.२९ डिसेंबर रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता नायगाव पंचक्रोशीतील कोलंबी येथील मठाधिपती गुरुवर्य श्री यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला 
-------------------------------------------------------------------
बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न वाढले पाहिजे या भुमीकेतून संचालक मंडळाने निर्णय घेऊन पहिल्या १००० मेट्रीक टन क्षमतेचे राष्ट्रीय कृषि विकास योजना व कृषी पणन मंडळाच्या एक कोटी रुपये निधीतून गोडाऊन बांधकाम करुन कार्यान्वीत केले. तर दुसरा टप्पा बाजार समितीने स्वनिधीतून ३५ शेतकऱ्यांना ७० लाख रुपयेचे कर्ज वाटप  शेतमाल तारण योजने अंतर्गत केले होते.
-------------------------------------------------------------------
 विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात बाजार समिती मार्फत उपबाजार पेठ असलेल्या मांजरम येथे हिदुस्थान पेट्रोलियमचा बाजार समितीच्या मालकीचा पेट्रोलपंप उभारून नायगाव बाजार समितीने जिल्यात एकप्रकारे आदर्श निर्माण केलेला आहे. या पंपामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मांजरं म परिसरात पेट्रोल पंप उभारल्यामुळे या परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय झाली आहे 
परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मांजरम पेट्रोल पंपाचे उदघाटन बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक  एस जी गन्लेवार  यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सचिव  एस व्ही कदम, हिंदुस्तान पेट्रोलियम चे जिल्हा व्यवस्थापक  शोबित सोनी  व कर्मचारी एम एस कदम ,माधव कुलकर्णी ,रामदास गायकवाड ,काळेश्वर बोमनाळे, मारुती पन्नासे, शंकर पापडु, साईनाथ भालेराव, व भुजंग माऊलीकर इत्यादी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला आहे 

सदर नावीन्यपूर्ण उपक्रमांस  नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास चव्हाण मांजरम ,चे सरपंच सौ. शोभाबाई निळकंठराव माली पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती मोहनराव पाटील धुपेकर, जि. प.सदस्यां सौ.पुनमताई पवार, माधवराव बेळगे ,हनुमंतराव चव्हाण ,माजी संचालक परसराम पाटील कांडाळकर, संजय रेड्डी ,भगवान पाटील  लंगडापुरे ,सतीश लोकमनवार ,शेषराव दासवाड, ,गणपतराव पाटील गायकवाड,  व्यापारी शंकर पाटील लाब्दे ,बालाजी कोटुरवार ,भगवान ताटे मुगावकर ,व मांजरम येथील गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments