नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नागपूर चलोची घोषणा दिली असून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एन जी पी ४५११ शाखा नायागांवच्या वतीने चलो नागपूर चलो नागपूर अशी घोषणा देण्यात आली आहे
---------------------------------------------------------------------
राज्यातल्या राज्यकर्त्यांनो ग्रामपंचायतच्या गरीब कर्मचारी संघटने कडे लक्ष देऊन त्यांच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मागण्या पूर्ण केल्या तर सदरील संघटनेच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल सदरच्या मागणीच्या संदर्भात नायगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संघटना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनास जाऊन विविध मागण्याचे निवेदन राज्यकर्त्यांच्या दरबारात देणार आहेत
---------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतच्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जवळपास हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एनजीपी ४५११ शाखा नायगावच्या मार्फत नागपूर चलो नागपूर चलो असे आवाहन संघटने केले आहे
दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले यात नायगाव तालुक्यातून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विविध मागणीचे निवेदन देण्यासाठी नागपूर येथे रवाना होत असल्याची माहिती मिळते आहे
नागपूरच्या अधिवेशनाला जाण्यासाठी नायगाव तालुकाध्यक्ष उत्तम नागरे व सचिव पठाण इस्माईल यांच्या वतीने आयोजन करून आवाहन करण्यात आले आहे

0 Comments