नायगांव प्रतिनिधी : मधुकर जवळे : -
नायगाव बिलोली तालुक्यातील महसूल विभागाची करण्याची संयुक्त बैठक नायगाव येथील तहसील कार्यालयात घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह उपजिल्हाधिकारी सचिन गिरी बिलोलीचे तहसीलदार निळे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी या बैठकीत उपस्थित होते
या बैठकीत जिल्हाधिकारी राऊत यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात येणाऱ्या सातबाराची तफावत महसूल विभागाने वसुलीचा दर्जा वाढवण्याच्या संदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या आहे
नायगाव व बिलोली प्रशासनात महसूल वाढवण्यासाठी सक्तीचा आदेश जाहीर केला असून येणाऱ्या काळात संबंधित नायगाव व बिलोली तालुक्यातील महसूल कर्मचारी महसूल वाढवतील काय ? महसूल वाढवण्यासाठी उपस्थित महसूल कर्मचारी हे एक दिलाने काम करतील काय असाही प्रश्न निर्माण झालेला आहे
नायगाव तालुक्यासह बिलोलीत गौण खजिन डबर मुरूम रेती भर दिवसा रोडने जाताना दिसत आहे नुकतेच एका ट्रॅक्टर चालकाने तहसील प्रशासनाच्या आवारात येऊन महिला कर्मचारी असणाऱ्या तलाठ्यास माझ्या ट्रॅक्टरला सोडून द्या अन्यथा मी तुमचे नाव लिहून आत्महत्या करेल अशी ही धमकी प्रशासनात येऊन दिल्या नंतर ही शासन गप्प बसले सदरील व्यक्तीस समज देण्याचा प्रयत्न केला ? आहे

0 Comments