Header Ads Widget

नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार दारू बंदी अधिकाऱ्याच्या शहरातील धाब्यावर घाडी तर ग्रामीण भागात का ? नाही उद्या थर्टी फस्ट -


    
      माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यानी नांदेड जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्या पासून कौतुकास्पद कामगिरी करत असून जिल्ह्यात विना परवाना धाब्यावर देशी दारू विक्री केली जात असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठाच्या आदेशानुसार सदरचे अधिकारी नांदेड शहरातच विनापरवाना धाब्यावर धाडी मारून अनेकांच्या मुसक्या आवळत आहेतदिनांक ३१ डिसेंबर २०२२ हे संपत असल्यामुळे व नव वर्षांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्तीक विशेष मोहीम राबविणार असल्याचे सांगण्यात येते परंतु परवाना नसलेल्या धाबावर किंवा हॉटेलवर अथवा मद्य प्राशासन केल्यास अथवा प्राशासनाची सोय उपलब्ध करून दिल्यास ढाबा मालक व ग्राहाकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे
ग्रामीण भागात विनापरवाना धाब्यावर अनेक ठिकाणी विदेशी देशी दारू विक्री होत असताना सुद्धा बिलोलीचे दारूबंदी अधिकारी का ? दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असल्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांनी या विभागाकडे लक्ष देतील काय असे ही जनतेतून बोलल्या जात आहेअवघ्या एका दिवसात नूतन वर्षांचे आगमन होणार असले तरी दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी या वर्षातील शेवटचा अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवसाला थर्टी फर्स्ट असे पुरातन नाव देण्यात आले आहे

थर्टी फर्स्ट रविवारीच येत असल्यामुळे या दिवशी खाण्या पिण्याच्या संदर्भात थर्टी फर्स्टचा दिवस साजरा केला जातो अनेक जन मद्यपान करून मज्जा लुटतात म्हणजे थर्टी फर्स्टचा आनंद घेतात परंतु या थर्टी फर्स्टच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यता असते शहरी भागासह ग्रामीण भागात दारू बंदीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली तर पुढील होणारे अनुचित प्रकार टळतील असे ही जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments