Header Ads Widget

पंतप्रधानांना मातृशोक नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन, १०० व्या वर्षी निधन नायगाव फास्ट न्यूजच्या भावपुर्ण श्रद्धांजली !"


    
      माधव पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले अली कडेच आजारी पडल्याने हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान हीराबेन यांचे निधन आहे दिनांक १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोज गुरुवारच्या मध्यरात्री अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती येथील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले  परंतु उपचारा दरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने हीराबेन मोदी यांना भावपुर्ण श्रद्धांजली वहाण्यात येत आहेहीराबेन यांच्या पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे

हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आईची तब्येत बिघडल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने अहमदाबाद येथे दाखल झाले होते. रुग्णालयात सुमारे तासभर थांबले होते. आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते
मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली.उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली आहे 

दरम्यान, हीराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.

Post a Comment

0 Comments