अपंग/दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जाहीर केला गेला ३ डिसेंबर हा दिवस नायगांव येथे सुद्धा मा.भाऊराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या दिवसाच्या औचित्यावर दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा म्हणून शहरातील दिव्यांग बांधव अशोक संभाजी वन्ने , सह आदी दिव्यांग बांधवांचा आपुलकीने पुष्पहार.शाल श्रीफळ देऊन व मिठाई चे वाटप करून त्यांचा सत्कार व गौरव केले
त्यांच्या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा केली, यावेळी प्रामुख्याने मा.भाऊराव पाटील चव्हाण, मा. गजानन पाटील चव्हाण.विठ्ठल पाटील गवळी. शिवानंद पांचाळ नायगांवकर, गणेश पाटील देगांवे.आशोक पवार दाजी.प्रशात बिरेवार.किरण पाटील मोरे.विठ्ठल बोरीकर. प्रविण बिरेवार. कपिल गारटेजी .दत्ता पाटील नारे. देशमुख सुजलेगावकर. शिवाजी येवते.सह आदी जेष्ठ बांधव सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------
दिव्यांग बांधव अशोक संभाजी वन्ने दोन्ही पायांनी अपंग असतानाही लढण्याची जिद्द कायम ठेवत गेल्या चाळीस वर्षांपासून नायगांव शहरातील दत्तनगर येथे टायर पंम्चर चे काम ते स्वतः सर्व छोटे मोठे वाहन टुव्हीलर गाडी चे टायर पंम्चर जोडण्यापासुन ते टायर खोल फिंटीग सह काम करून परिवाराचा उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत, अशोक संभाजी वन्ने हे बांधव दोन्ही पायांनी अपंग असतानाही व अनेकांसाठी आदर्शवत ठरणारे आहेत मनात लढण्याची ताकद जिंकण्याची जिद्द आणि स्वाभिमान असेल तर जीवन जगणे सहज सोपे होते,
-------------------------------------------------------------------
अशी शिकवण जणू त्यांनी अनेकांना दिली आहे, अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळावे, आपण जे करू शकतो ते सर्व काही तेही करू शकतात म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाही तर आपुलकीची गरज आहे, कोणताच दिव्यांग बांधव कमकुवत नसतो त्याच्याकडे अफाट अशी उर्जा असते फक्त आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना बळ देण्याचं काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले,

0 Comments