Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे लक्ष्मण शक्तीच्या निमित्ताने गावकऱ्याच्या वतीने महाप्रसाद !!


नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :-

नायगांव तालुक्यातील मौजे बेटकबिलोली येथे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी विठ्ठल रूक्मिणी मातेच्या ३७ व्या वाढदिवसाच्या निमिताने समस्त गावकऱ्यानी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण  त्याच बरोबर लक्ष्मण शक्तीचा महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील बेटक बिलोली येथील समस्त गावकरी बांधवानी सदरील कार्यक्रमाचे संयुक्त पणे कार्यक्रमाचे आयोजन करून लक्ष्मण शक्तीच्या निमित्ताने महा प्रसादाचे ही आयोजन केले असल्याचे गावकऱ्यानी सांगितले असून सदरचा सुंदर असा सोहळा दरवर्षी गावकरी आयोजित करीत असल्याने गावाचे नाव नावा रुपाला आले आहे
-------------------------------------------------------------------
बेटक बिलोली येथे महाप्रसादचे आयोजन करण्यात आले असून साधू संत मंहत किर्तनकार प्रवचणकार टाळकरी माळकरी वाचक सुचक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून या गावात सदरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूरचे स्वरूप आले असल्याचे दिसून येत आहे

गावांत ह.भ.प गाथा मुर्ती सदगुरु श्री गुरूवर्य चंद्रशेखर गुंडा महाराज देगलूर यांच भव्य हरिकिर्तन भजन पुजन आदी कार्यक्रम संपन्न होत आहेत या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्ताची आलोट गर्दी झाली असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत सदरच्या कार्यक्रमाला महिला पुरुषासह लहान मुले उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments