माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर फाटा ते कुंटूर रस्त्याचे काम चालू करण्यात आले असून गुत्तेदार राहुल पाटील यांनी लोकांची व येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकाची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यावर मोठी यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे चित्र दिसून येत असून सध्याच्या परिस्थितीत गिट्टी व मुरुम व टँकरने पाणी टाकून रुलरने मजबूत दबई करत असल्याचे दिसून येत आहे
तालुक्यातील कुंटूर फाटा ते कुंटूर रस्त्याचे अनेक वर्षा पासून केल्या जातं नव्हते परंतु सदरील बेवारस रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले असल्यामुळे गुत्तेदार राहुल पाटील नकाते बेटकबिलोली यांना मिळाल्यामुळे कामाला चांगलीच गती मिळाली तर रोजगाराना रोजगार उपलब्ध झाला आहे
शासनाने ग्रामीण भागात अशा अनेक रस्त्याची कामे मंजूर केल्यास रस्ते झकास होतील असे जनतेतून बोलल्या जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याचे व कुंटूर फाटा ते कुंटूर रस्त्याचे काम जलद गतीने चालू असल्यामुळे वाहनधारका सह जनतेला सहजरित्या प्रवास करण्यासाठी सोपे जाईल असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
रुई बु.रस्त्याचे काम नामदेव पाटील टेंभुर्णीकर यांनी मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवून जलद गतीने काम चालू केले त्याच पद्धतीने कुंटूर फाटा ते कुंटूर रस्त्याचे काम राहुल पाटील नकाते यांनी सुद्धा कामावर सर्व यंत्रणा सज्ज केले असल्यामुळे हे सुद्धा काम जलद गतीने होतो ना दिसून येत आहे

0 Comments