नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :-
नायगाव तालुक्यातील मौजे देगांव येथे लागलेल्या भीषण अगी दरम्यान नायगाव नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या कामगिरीमुळे सदरचे अग्नीतांडव थंड झाले असले अचानक लागलेल्या शॉट सर्किटमुळे दोन दुकाने भस्मसात झाले आहे
सदरील घटनेची माहिती मिळताच नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी पाहणी करून महसूल विभागाच्या मार्फत सदरील घटनेचा पंचनामा करण्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिले आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील देगाव येथे दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी मध्ये रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्म सात झाले यात लाखो रुपयाचे नुकसान झाले नायगाव येथील रहिवासी असलेले गजानन ट्रेनिंग कंपनी व कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानांना बुधवारी रात्रीच्या मध्यरात्री शॉट सर्किटमुळे अचानक लाग लागली आहे
---------------------------------------------------------------------
सदरच्या अग्नी तांडवात मोठे नुकसान झाले सदरच्या अंदाजे ५०० ते ५५० सोयाबीनची पोते व रासायनिक औषधी भस्म झाले असल्याची माहिती मिळते आहे
नायगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने आग विजविल्याच्या दुकानातील साहित्यांचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते सदरच्या आवाजाने गाड झोपेत असलेल्या नागरिकांना आवाजाची चाहुल लागली व सर्व गावकरी जागे झाले असल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूज तालुका प्रतिनिधी मधुकर जवळे यांनी कळविले आहे
नायगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या गाडीला गावकऱ्यानी संपर्क करून माहिती दिली असल्यामुळे सदरची गाडी देगांव येथील घटनास्थळी दाखल होऊन आग विजविली असून या संदर्भात नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

0 Comments