माधव पवार
तरोडा खुर्द भागातील ओंकारेश्वर नगर येथे ह.भ.प बालाजी महाराज पांचाळ, ह.भ. प. पांडुरंग महाराज पांचाळ पासदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोज रविवार पासून टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे
सतत सात दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताह शिवलीलामृत पारायण,काकड आरती, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व हरि कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम पार पडत आहे
---------------------------------------------------------------------
चिमुकलीची पार्थना : ये पंढरीच्या पांडुरंगा नूतन वर्षे अगदी एका दिवसावर आल्यामुळे सर्व जनतेस नूतन वर्ष सुख समृद्धीचे जावे मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्व जन सज्ज आणि नूतन वर्षांचे स्वागत करण्यासाठी नूतन विचाराने स्वागत करावे आणि पांडुरंगा माझे आय एस होण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे हीच पांडुरंगा तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे
---------------------------------------------------------------------
गेल्या चार दिवसात ह.भ.प. बालाजी महाराज पांचाळ, तुकाराम महाराज चाटोरीकर, आत्माराम महाराज रायवाडीकर, गंगाधर महाराज एकलरा यांचे कीर्तन झाले तर नूतन वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी काल्याच्या कीर्तनाने आयोजित सप्ताहाचे समारोप होणार आहे
दरम्यान ह.भ.प. सदानंद महाराज रायवाडीकर लोहा, ह.भ.प.वारकरी भूषण ज्ञानोबा माऊली महाराज सिंदगीकर व शेवटचे काल्याचे किर्तन हे.भ.प.निळोबा महाराज हरबळकर यांचे किर्तन होणार असून आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात गजानन काळे हे महाप्रसादाचे आयोजन केले आहे
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी रामदास पांचाळ, व्यंकट पाटील शिरूर, केशव महाराज वानखेडे, हनुमंत पांचाळ, राम महाराज सुगावकर, मोतीराम बनवास, नामदेव शिलगुंडे, सुदाम चाटोरीकर, विठ्ठल पाटील यांच्यासह ओंकारेश्वर नगरातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत

0 Comments