Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळा शिवारात पत्यावर जुगार खेळणाऱ्या आड्यावर सपोनि महादेव पुरी यांची धाड १६ आरोपीवर गुन्हा दाखल


  
   

       
माधव पवार
 नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळा शिवारात पत्त्यावर जुगार लावून पैसे खेळणाऱ्या लोकांची गोपनिय माहिती मिळाल्यानुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्यासह पोलीस टीमने दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी अड्ड्यावर धाड मारली आहे
---------------------------------------------------------------------
कुंटूर पोलिसांनी दमदार कारवाई करत पोलीस ठाण्यात १६ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सपोनि पुरी यांनी दिली आहे
तालुक्यातील  कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे कहाळा शिवारात काही लोक पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत होते परंतु सदरच्या अड्ड्यावर धाड मारण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी याने महत्वपूर्ण पथक तयार करून सदरील अड्यावर छापा मारला आहे

सदरील घटनास्थळीच ६ आरोपीला रंगेहात पकडले असून त्यांच्या कडून नगदी १२ हजार ९६० रुपये व जुगाराचे साहित्य व ५ मोटर सायकल असा एकूण २ लाख ७ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहेकुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीसाच्या नजरा चुकून पत्याचा जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यावर कुंटूर पोलिसांची करडी नजर असल्यामुळे असे अनेक अड्डे उध्वस्त पूर्वी करण्यात आले आहेत यातील एकूण १६ आरोपी च्या विरोधात कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे

सदरची दमदार कार्यवाई सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अटकोरे संजय,पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार,शंकर बुध्देवाड यांनी केली तर सदरची फिर्याद पोहेका कंधारे  यांनी दिली आणि पुढील तपास संजय अटकोरे करीत आहेत

Post a Comment

0 Comments