नायगाव तहसील कार्यालयाच्या तत्कालीन कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ सुरेखाताई नांदे यांच्या कार्यकाळात नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागात व खेड्यापाड्यात पांदण रस्त्याचे कामे दर्जेदार व मोठया प्रमाणात करण्यात आले आहे
------------------------------------------------------------------
ग्रामीण भागातील त्यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून सदरच्या तहसीलदाराने व ग्रामपंचायत कार्यालयाने रस्त्याचे कामे मार्गी लावल्याने शेतकऱ्यांसाठी सदरचे रस्ते उपयोगी ठरले आहेतालुक्यातील आंतरगावासह अनेक गावांत तत्कालीन
तहसीलदार सौ सुरेखाताई नांदे यांनी स्वतः पांदण रस्त्याच्या कामाला प्राधान्य देऊन ग्रामपंचायतच्या मार्फत करून घेतले असल्यामुळे सदरच्या कर्तव्याचे कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक सध्या होत असून सध्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी बजावत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे
-------------------------------------------------------------------
नायगावच्या तहसील महसूल विभागाला तत्कालीन तहसीलदार सौ सुरेखाताई नांदे यांनी रेतीच्या माध्यमातून व विट्ट भट्टीला लागणारी माती आणि मुरूम यांच्या माध्यमातून मोठा महसूल विभागाला फायदा करून दिला होता त्याच पद्धतीने तहसीलदार गजानन शिंदे यांनी सुद्धा महसूल विभागाला फायदा करून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्यामुळे सदरच्या नायगावचे तहसीलदार शिंदे यांनी पांदण रस्त्याच्या जास्तीचे प्राधान्य दयावेत असी मागणी होत आहे

0 Comments