Header Ads Widget

नायगाव पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजनेतुन मंजूर करण्यात आलेली विहिरी चोरीस जाऊ नये अधिकाऱ्यानी काळजी घ्यावी !!


     माधव पवार
नायगाव पंचायत समिती कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून विहिरी मंजूर करण्यात येत असल्यामुळे सदरच्या विहिरी चोरीस जाऊ नये यांची दक्षता पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांच्यासह अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असे जनतेतुन बोलल्या जात आहे
---------------------------------------------------------------------
गेल्या काही वर्षाखाली पंचायत समितीच्या मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या परंतु अनेक ठिकाणी विहिरीचे बांधकाम न करताच बिले उचलून घेतले असल्याचे सांगण्यात येते
नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी एल आर वादे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहिरीची पाहणी करावी विहिरीचे बांधकाम अथवा खोदकाम करण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना देण्याची गरज भासत आहे
---------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांच्या विहिरीचे वेळोवेळी बिले देण्यासाठी अंतर्गत अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्यांना सूचना करावेत पंचायत समितीच्या मार्फत अनेक लोकांना घरकुल योजना आली होती परंतु मंजूर व पात्र लाभार्थ्यांनी हप्ते घरकुलाचे उचलून घेऊन घरे भुई सपाट ठेवले असल्याचे अनेक गावात वास्तव चित्र दिसून येत आहेमहाराष्ट्र शासन गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला स्वतःच्या हक्काचा निवारा राहावा म्हणून एकीकडे प्रयत्न करीत असताना सुद्धा पात्र लाभार्थ्यांना घरकुले येऊन सुद्धा बांधण्यास तयार नसल्यामुळे कमालीचे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे

तशाच पद्धतीने पंचायत समिती कडून मिळत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीला मंजुऱ्या नुसत्या मंजूऱ्याच राहू नयेत शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार विहिरीचे खोदकाम करून बांधकाम केल्यास त्यांना त्यांच्या भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचे ही शासनाचे धोरण असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विहिरीचे काम परिपूर्ण  करून घ्यावेत अशी शासनाची अपेक्षा आहे 

Post a Comment

0 Comments