Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल असल्यामुळे उमेदवाराच्या पोटात हुडहुडी - सरपंच कोण होणार ? -


      माधव पवार
नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणूकीचे मतदान दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी झाले असल्यामुळे सर्व उमेदवाराचे भवितव्य मत पेटीत बंद झाले यांचं मतपेटी मधूनच दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी सदरच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे 
---------------------------------------------------------------------
ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीतील याच मतदान पेटीतुन राजा राणी जन्मास येणार असल्यामुळे सदरच्या उमेदवाराच्या पोटात निकाल आज असल्यामुळे पोटात चांगलीच हुडहुडी भरल्याचे सांगण्यात येत आहे
---------------------------------------------------------------------
तालुक्यातील पिंपळगाव आंतरगाव, सातेगाव, सुजलेगाव, रुई खुर्द, ताकबीड, तलबीड ( गंगनबीड ) मरवाळी येथील उमेदवाराच्या पोटात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे गावचा महत्वाचा कारभाऱ्याचा जन्म मत पेटीतुन होणार आहे
---------------------------------------------------------------------
ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत गेल्या एक ते दोन महिन्या पासून पार्टी प्रमुखासह त्यांचे कार्यकर्ते व उमेदवार हे अतिशय रात्रंदिवस परिश्रम घेतले होते त्यांच्या परिश्रमाचे फळ पार्टी प्रमुखाना मिळाले पाहिजे आपआपल्या पार्टीला वाटणे साहजिक असते परंतु अटी तटीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदाराने दिलेला मतदानाचा कौल हे उमेदवाराना मान्यच करावे लागणार आहे

Post a Comment

0 Comments