Header Ads Widget

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असल्यामुळे आंतरगाव सातेगाव सुजलेगाव ताकबीड रुई खुर्द येथे शांतता राखा अन्यथा कायदा हातात घेणाऱ्याची केली जाणार नाही - सपोनि महादेव पुरी !!

  
     माधव पवार
नायगाव तालुक्यातील अंतरगाव सातेगाव सुजलेगाव ताकबीड रुई खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीचा निकाल आज दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी लागला असल्यामुळे गावात शांतता अबाधित राहण्यासाठी गावकऱ्यांनी एक दिलाने राहावे असे आव्हान कंटूर पोलीस ठाण्याचे सपोनी महादेव पुरी यांनी केले आहे
तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंतरगाव सुजलेगाव ताक बीड सुजलेगाव रुई खुर्द सातेगाव येथील निकाल जाहीर झाला गावात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला गावात शांतता राहण्यासाठी पोलीस प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे
ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्याच्या नंतर सदरच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असल्याने गावात हुलडबाजी व कायदा हातात घेणाऱ्यांची कसल्याच प्रकारची गय केली जाणार नसल्याचे कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनी महादेव पुरी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे

गावात शांतता राहावी हा पोलीस प्रशासनाचा मूळ हेतू असल्यामुळे कोणीही वाद-विवाद करू नये जर केल्यास त्यांची गैय केली जाणार नसल्याचे ही सपोनि पुरी यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments