Header Ads Widget

बालाजी भिलवंडे यांना डॉ.शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार प्रदान !"

 

 नरसी : गोविंद नरसीकर :-

नांदेड जिल्हा परिषद विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा डॉ. शंकरराव चव्हाण कनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी नायगाव तालुक्यातील नरसी येथील प्रगतशील शेतकरी बालाजी हाणमंतराव पा. भिलवंडे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांचा श्रीक्षेत्र माळेगाव येथील एका आयोजित कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,आ.शामसुदर शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमनशट्टे, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे,आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे. 
नायगाव तालुक्यातील नरसी येथील प्रगतशील शेतकरी बालाजी भिलवंडे यांनी आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण उत्पादन घेतले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार त्यांना माळेगाव येथे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी भिलवंडे यांनी आभार मानले आहेत. मिळालेल्या पुरस्कारामुळे कृषीक्षेत्रात अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली असून आगामी काळात ग्रामीण भागातील शेती अधिक संपन्न आणि समृद्ध करण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू, असा विश्वास बालाजी भिलवंडे यांनी व्यक्त केला आहे

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल काँग्रेसचे युवा नेते रविन्द्र पाटील चव्हाण, काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, नंदकिशोर टोकलवाड, माजी उपसरपंच सुधाकर पाटील भिलवंडे, संदीप भिलवंडे,जबारखान पठाण, जळबा सुर्यवंशी आदीनी अभिनंदन केले आहेत.

Post a Comment

0 Comments