Header Ads Widget

जनतेला कोरोना महामारी पेक्षा लॉक डाऊनची भीती - ? ग्रामीण भागात होतोय अफवा !!

   
      माधव पवार
जनतेला कोरोना महामारीची भीती नाही परंतु लॉक डाऊन पडणार काय असा प्रश्न पडला असल्यामुळे ग्रामीण भागात लॉकडाऊनचीच चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
---------------------------------------------------------------------
कोविड १९ दरम्यान लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनसामान्य माणसाची बेहाल झाली होती घराच्या बाहेर एका ही व्यक्तीला फिरण्याची परवानगी नव्हती गोरगरीब जनतेच्या हाताला काम नसल्यामुळे जनसामान्याच्या कुटुंबाची भयानक परिस्थिती निर्माण झाली होती
राज्यातील व ग्रामीण भागातील जनता व नागरिक कसे तरी  दोन वर्षे काढले सध्याच्या परिस्थितीत सर्व काही सुरळीत असताना अचानकपणे कोरोना महामारीचे संकट व लॉकडाऊनचे येणार की काय ? असा प्रश्न करीत अफवा पसरली जात असल्यामुळे जन सामान्य माणसात एक संकटच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे
ग्रामीण भागात कोरोना महामारीच्या नावाखाली शाळा बंद करण्यात आल्या होत्या मंदिर बंद करण्यात आले होते यात्रा बंद करण्यात आल्या होत्या तशी परिस्थिती शासनाने निर्माण करू नयेत असे जनतेतून बोलल्या जात आहे

जनसामान्य माणूस कोरोना महामारीला भीत नाही परंतु लॉकडाऊनला जास्तीचे घाबरतो ? कोरोनाचे संकट निर्माण करण्या पेक्षा विकासाकडे लक्ष देत विध्यार्थीना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यावंर भर देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे असे ही जनतेतून बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments