Header Ads Widget

आंतरगावाच्या विकासासाठी प्रधान्य देऊ नूतन सरपंच गजानन पाटील तोडे यांची प्रतिक्रिया !!

     
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगावच्या विकासासाठी जास्तीचे लक्ष देऊन विकासाला गती देण्यासाठी काम करणार असल्याचे नूतन सरपंच गजानन पाटील तोडे यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले असून नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदार राजानी प्रचंड मतांनी विजयी केले असल्यामुळे त्यांच्यासाठी आंतरगावची ग्रामपंचायत सज्ज असणार आहेतालुक्यातील आंतरगावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपा आंतरगावचे नूतन सरपंच गजानन आनंदा तोडे यांच्यासह रविकांत संभाजी तोडे वच्छलाबाई दत्ता शिंदे माधव पांडुरंग पवार दत्ता पांडुरंग तोडे शांताबाई अशोक तोडे लक्ष्मीबाई गोविंद शिंदे तानाजी विठ्ठल तोडे सुशीलाबाई नागनाथ इबितवार रुक्‍मीनबाई रामा पवार हे विजयी झाले आहेत
आंतरगावची ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या दिशेने वळविण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले पाहिजे आणि गावातील विविध समस्यावर मात करण्यासाठी नूतन सरपंच म्हणून गजानन तोडे प्रयत्न करणार असल्याचे सांगत गावातील तमाम मतदार बांधवाचे जाहीर आभार मानले गावच्या विकासाला चालना देण्यासाठी गावकऱ्यानी एकहाती सत्ता देऊन सहकार्य केले असल्याचे नूतन सरपंच गजानन तोडे यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments