माधव पवार
धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण विध्यार्थीना मिळत असल्यामुळे एक प्रकारची संजीवनीचा डोस पाजल्या सारखे होत असल्याने विध्यार्थी हा भविष्यातील देशाची संपती असल्याचे मत बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी रुई बुच्या महिला सरपंच सौ प्रियंकाताई निलेश देशमुख यांच्या संल्पनेतून निर्माण केलेल्या गुणवंताच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष पदा वरून व्यक्त केले आहे
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात सदरचा महत्वकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी आयोजित केला आहे
सदरच्या अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर म्हणाले की सरस्पती रुई (बु ) येथे विद्या घेऊन दडली व इश्वर या गावात रुजला असल्यामुळे पालक आणि शिक्षक एकाच नाण्याच्या बाजू असल्यामुळे येथे माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या शांती निकेतन विद्यालयात शिक्षक विद्यार्थीना दर्जेदार मिळत आहे
रुई बु येथील शांती निकेतन विद्यालय अर्थात संस्था काढल्यामुळे दहावी पर्यत शिक्षण मिळत असल्यामुळे माजी मंत्री स्वा. कुंटूरकर यांचा उद्देश परिपूर्ण झाला असल्याचे मत ही बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी म्हणाले आहे सदरची शाळा ही नावा रुपाला आली असल्यामुळे विध्यार्थी उच्च पदावर जात असल्याचे त्यांनी म्हणाले आहेरुई बु येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब धर्माधिकारी होते तर व्यासपीठावर गावचे माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे, सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख,मुख्याध्यापक बनाळीकर विद्युत वितरण कंपनी युनिट कृष्णूरचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव, लाईनमन बोईनवाड, हांनमतराव पांडे, पिंटू देशमुख, ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी, विठ्ठल पाटील वडजे, दैनिक प्रजावाणीचे पत्रकार माधव पवार, तुकाराम पाटील महागावे, कोंडीबा दासरवाड, दिंगाबर गोरठकर, हिवराळे, नितेवाड, इबितवार, आदी शिक्षक वर्ग ही मोठया संखे उपस्थित होते

0 Comments