माधव पावर / रामराव पाटील ढगे :-
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह दंगल नियंत्रण गाडी आंतरगावच्या मतदान केंद्रावर तैनात ; कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या कडक भूमिकेमुळे तणावपूर्ण शांतता असुन मतदान केंद्रावर मतदान शांततेत चालू असल्याचे दिसून आले आहेकुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या कडक भूमेकेमुळे आंतरगावच्या मतदान केंद्रावर असे शांततेत मतदान चालत आहे
नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीचे मतदान सकाळी चालू करण्यात आले असताना काही मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत होत असून तालुक्यातील आंतरगाव येथे ग्रामपंचायतच्या निवडणूकी दरम्यान मतदान केंद्रावर किरकोळ वाद झाला असल्याचे दिसून आले आहे
-------------------------------------------------------------------
असताना हा कुठे तरी थांबला पाहिजे आणि वातावरण शांत होऊन मतदान शांततेत पार पडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह सपोनि महादेव पुरी यांनी दंगल नियंत्रण कक्षाच्या गाडीला आंतरगावच्या मतदान केंद्रावर तैनात केले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि महादेव पुरी यांच्या कडक भूमिकेमुळे मतदान केंद्रावर तणावपूर्ण शांतता असल्यामुळे मतदान योग्य दिशेने केले जात असल्याचे वास्तव चित्र पाहवयास मिळाले आंतरगावच्या मतदान केंद्रावर म्हणजे जिल्हा परिषद शाळेवर सदरचे मतदान होत असून या मतदान केंद्रावर सपोनि महादेव पुरी यांनी मोठा पोलीस फौज फाटा तैनात केला आहे आंतरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात महिला पुरुषासह मतदान करण्यासाठी केंद्रावर आले असताना या ठिकाणी दोन्ही गटाच्या लोकांकडून वादाची ठिगंणी उडाली होती
परंतु कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या कडक भूमिकेमुळे सदरचा वाद अटक्यात आला असून या सदरच्या मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला त्याच बरोबर दंगल नियंत्रण कक्षाची गाडी सुद्धा या ठिकाणी पाचरण करण्यात आली आहे


0 Comments